
जिल्हा शासकीय रुग्णालयात ८० टक्के पदे रिक्त
रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांनी आमदार प्रमोद जठार यांना रुग्णालयातील सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली. रुग्णालयात टक्के डॉक्टर आणि कर्मचार्यांची पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचार्यांवरच कामाचा ८० प्रचंड ताण येत आहे. त्यातच – आता रुग्णालयातील परिचारिकांची संख्याही कमी केली जात असल्याने आरोग्य सेवा कोलमडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. परिचारिकांची नियुक्ती करताना त्यांना सीईटी परीक्षा अनिवार्य करू नये, तर जीएनएम केलेल्या स्थानिक विद्यार्थ्यांना भरतीत प्रथम प्राधान्य दूर करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने विशेष स्टाफची तातडीने भरती करावी, एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करावी, तसेच अत्यंत महत्वाचे असलेल्या भूलतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी, अशा विविध मागण्या डॉक्टरांनी जठार यांना घातले.
www.konkantoday.com




