
चिंचखरी फाटकवाडी येथे सोमवारी गुरुप्रतिपदा उत्सव
रत्नागिरी दि.३० : शहराजवळील चिंचखरी फाटकवाडी येथील दत्त मंदिरात सोमवार दि.२ फेब्रुवारी २०२६ रोजी गुरुप्रतिपदा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी ६:४५ आरती, सकाळी ७:०० वाजता नामजपाची सुरुवात, दुपारी १२:३० नंतर महाप्रसाद, सायंकाळी ७:०० वा नामजपाची सांगता आरती, प्रार्थना, गाऱ्हाणे, प्रसाद होऊन उत्सवाची सांगता होणार आहे. तरी नामजप सेवेत व गुरुप्रतिपदा उत्सवात भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन समस्त फाटक कुटुंबीयांनी केले आहे.




