अबु आझमी यांची जीभ घसरली,नितेश राणेंवर अत्यंत जिव्हारी टीका


समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांची जीभ सतत घसरत असते. टीका करताना त्यांना भान जपता येत नाही. आता हिंदुत्वाच्या मुद्दावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना पातळी सोडली.नितेश राणे हे मुसलमानांना म्हणतात की कुराण पठण करायचे असेल तर पाकिस्तानात जा. मला जर ताकद मिळाली तर राणेंची जीभ नाही हासडली तर मला माझ्या बापाचा मुलगा म्हणून नका, असं विचित्र वक्तव्य आझमींनी केले. इतक्यावरच न थांबता त्यांनी राणेंवर जिव्हारी टीका केली.

तो मंत्री नेपाळी दिसतो

यावेळी नितेश राणे यांच्यावर टीका करताना त्यांचा पराकोटीचा द्वेषही दिसून आला. तो बुटका मंत्री नेपाळी दिसतो अशी टीका त्यांनी केली. राणे हे मशिदीत घुसून मुसलमानांना मारणार अशी भाषा करतात. आम्ही काय बांगड्या भरल्यात का, अशी बडबड आझमींनी केली. तुझ्यात इतका दम आहे, तर पोलिसांना बाजूला कर आणि मग ये मशिदीत, तुझी काय अवस्था होते ते पाहा. आजपर्यंत एखाद्या मुस्लिमाला तुम्ही मंदिराबाहेर नारे देताना पाहिले का? असा सवाल अबू आझमी यांनी केला. तर आम्ही राम नवमीला पाणी वाटप करतो आणि हे मंत्री आम्हाला देशात राहायचे तर वंदे मातरम म्हणावे लागेल अशी धमकी देतो, अशा शब्दात आझमींनी राग व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button