राजापूर शहरानजीकच्या शीळ येथील सड्याला वणवा…

राजापूर :शहरानजीकच्या शीळ येथील सडा वणवा लागून गेल्या ३ दिवसांपासून वणव्यामध्ये होरपळत होता. निकराच्या प्रयत्नामुळे वणवा आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले असले तरी वणव्यामध्ये वैरणाच्या गवतासह डोंगर भागामध्ये शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या आंबा, काजूच्या बागांना वणव्याची झळ पोहचली. दरम्यान गेल्या काही वर्षामध्ये दिवाळीनंतर नोव्हेबर डिसेंबर महिन्यामध्ये आणि त्यानंतर पुढे काही महिने या भागामध्ये सातत्याने वणवा लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सातत्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
नजीकच्या शीळच्या डोंगरावर ३ (सड्यावर) दिवसांपूर्वी सायंकाळी वणवा लागल्याची घटना घडली. त्यामध्ये डोंगर परिसर होरपळून गेला. सोसाट्याचा वारा आणि त्याला सुकलेले गवत याची साथ मिळून
वेगाने पसरलेल्या वणव्याची झळ शीळ गावासह लगतच्या गोठणेदोनिवडे भागालाही काही प्रमाणात बसली. त्यामध्ये त्या भागातील गवत आणि जंगल परिसर जळून खाक झाला. ही आग वा वणवा नेमका कोणी लावला वा कसा लागला, याबाबत ठोस माहिती नसली तरी लागलेल्या वणव्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या बागांना त्याची झळ पोहचली आहे.
सड्यावर गुरांना चरण्यासाठी असलेले गवतही जळून खाक झाले. वणव्यामध्ये डोंगर होरपळतअसताना रात्री उशिरापर्यंत शीळ येथील मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी सुमारे तीन-साडेतीस तास निकराचे प्रयत्न करून वणवा आटोक्यात आणला. त्यामुळे वणव्यात जळून खाक होण्याची शक्यता असलेल्या काही शेतकऱ्यांच्या आंबा व काजूच्या बागा वाचल्या आहेत. मात्र, गुरांना चरण्यासाठी असलेले बहुतांश भागातील गवत वाचवण्यात ग्रामस्थांना अपयश आले असून गवत खाक झाले. शेतकऱ्यांच्या गुरांच्या वैरणाचा प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button