
चिपळूण येथील वाशिष्ठी कृषी महोत्सवात बकासूर, लखनची ’रॉयल एन्ट्री’
बैलगाडा शर्यतीत १२ हिंदकेसरी किताब जिंकत अधिराज्य गाजवत असलेला बकासूर व अनेक शर्यतीत फॉर्च्यूनरचा मानकरी ठरलेल्या लखन बैलांची वाशिष्ठी डेअरीच्या कृषी महोत्सवात जोरदार रॉयल एन्ट्री झाली.
ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने महोत्सव ठिकाणी आगमन झाले. यावेळी हौशी बैलगाडाप्रेमींच्या उसळलेल्या तोबा गर्दीने आणि फोटोसेशनसाठी सरसावलेल्या मोबाईलप्रेमींमुळे कृषी महोत्सव नगरी ’पॅक’ झाली.
वाशिष्ठी डेअरीच्यावतीने शहरातील बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर सावस्कर मैदानावर सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. या महोत्सवात ग्रामीण जीवन संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. असे असतानाच या महोत्सवात विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे बैलगाडा शर्यतीत्त अधिराज्य गाजवत असलेल्या बकासूर व फॉर्च्यूनर गाडीचा मानकरी लखन या बैलाची रॉयल एन्ट्री. बकासूरच्या चिपळुणातील आगमनाची बैलगाडाप्रेमींना मोठी उत्सुकता लागून राहिली होती.
सोमवारी आगमन झालेल्या बकारसुराचे वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी स्वागत केल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात महोत्सवाच्या ठिकाणी आगमन झाले, यावेळी बकासुराला बघण्यासाठी हौशी बैलगाडाप्रेमींनी तोबा गर्दी झाली होती. प्रत्येकजण या बैलाचे फोटो काढण्यासाठी धडपडत होता.www.konkantoday.com




