ग्रामीण भागातील येणार्‍या लाभार्थीना दाखविण्यासाठी बांधलेले ’डेमो हाऊस’ बनले शोभेचे बाहुले


देवरुख शहरातील पंचायत समिती इमारतीनजीक ३ वर्षापूर्वी उभारण्यात आलेले डेमो हाऊस उदघाटनानंतर बंद अवस्थेत आहे. यामुळे ग्रामीण भागातून येणार्‍या व लाभ घेऊ इच्छिणार्‍या ग्रामस्थांना डेमो हाऊस पाहता येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. हे डेमो हाऊस सध्या शोभेचे बाहुले बनले आहे. कार्यालयीन वेळेत हे डेमो हाऊस खुले ठेवण्यात यावे, अशी मागणी जनतेमधून होत आहे.
प्रत्येकाला स्वतःचे टुमदार घर असावे असे स्वप्न असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ते सर्वांना शक्य होत नाही. गोरगरिबांना मदतीचा हात देऊन त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास शासनाकडन योजना राबवली जात आहे. लाभार्थ्यांना पक्के घर कसे बांधायचे हे प्रत्यक्ष पाहता यावे, यासाठी संगमेश्वर पंचायत समिती इमारतीजवळ राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत डेमो हाऊस उभारण्यात आले. याचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते थाटात करण्यात आले होते. उदघाटनानंतर या डेमो हाऊसला कुलूप लावण्यात आले, ते अद्याप उघडण्यात आलेले नाही.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button