
गर्लफ्रेंडसोबत वाद झाला अन् डोंबिवलीतील तरुणाने 11व्या मजल्यावरुन उडी घेतली, पहा व्हिडिओ
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीतून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने इमारतीच्या 11व्या मजल्यावरुन उडी घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.ऋषिकेश परब असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो 21 वर्षांचा होता. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऋषिकेश याचा गर्लफ्रेंडसोबत वाद झाला होता. या वादानंतरच त्याने टोकाचं पाऊल उचललं. डोंबिवलीतील इमारतीच्या 11व्या मजल्यावरुन पडून त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.




