कोकण परिमंडळात १५१ कोटी ५१ लाखाची थकबाकी असल्याने महावितरणसमोर वसुलीचे आव्हान

कोरोना प्रादुर्भावामुळे घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणची बिल वसुलीची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्याचा फटका महावितरणला बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १ कोटी ६१ लाख ३०३ ग्राहकांकडे तब्बल ८४ कोटींची थकबाकी शिल्लक आहे. तर कोकण परिमंडळात १५१ कोटी ५१ लाखाची थकबाकी असल्याने महावितरणसमोर वसुलीचे आव्हान उभे राहिले आहे.मात्र आता वरिष्ठ पातळीवरूनच वसुलीचे आदेश आले आहेत त्यामुळे थकबाकी कमी होईल असा अंदाज आहे
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १ कोटी ६१ लाख ३०३ ग्राहकांके ८४ कोटी ६८ लाख ३ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये घरगुती १ लाख ३२ हजार ९०२ ग्राहकांकडे ४२ कोटी २४ लाख ३ हजार वाणिज्यीकच्या १ लाख ७ हजार २५७ ग्राहकांकडे १६ कोटी १५ लाख ५७ हजार, औद्योगिकच्या दोन हजार ४०२ ग्राहकांकडे ९ कोटी ९० लाख ८७ हजार रु. थकबाकी शिल्लक आहे.
कृषीच्या ९६ ग्राहकांके १ लाख ९ हजार, १४८४ सार्वजनिक संस्थांकडे ७ कोटी ६८ लाख ४० हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या १ हजार ६६४ ग्राहकांकडे ४ कोटी ८२ लाख २५ हजार रु. थकबाकी आहे. सार्वजनिक सेवांतर्गत एक हजार ७८९ ग्राहकांकडे एक कोटी ४ लाख ८९ हजार. अन्य एक हजार ९९२ ग्राहकांकडे ९८ लाख १८ हजार रुपयांची थकबाकी आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button