मंडणगड येथील बाजार पेठेच्या परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा पोलिसांच्या ताब्यात


मंडणगड येथील बाजार पेठेच्या परिसरात तालुक्यातील ग्रामीण भागातील दोन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या एकास मंडणगड पोलिसांनी रविवारी (दि. १८ रोजी) ताब्यात घेत त्याला अटक केली आहे.
मंडणगड शहरात शनिवारी दि. १७ रोजी घडलेल्या या गुन्ह्यासंदर्भात सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार फिर्यादी व त्यांच्या सासू, पती व लहान मुलगी हे चौघे मंडणगड एस्टी स्टँड या ठिकाणी बसलेले असताना फिर्यादी यांचा चुलत दीर आरोपी दिनेश बबन हिलम हा मंडणगड एस्टी स्टँड या ठिकाणी आला. फिर्यादी यांना मुलीस खाऊ देतो असे सांगून त्यांच्याकडून मुलीस घेऊन गेला. तो बराच वेळ झाला तरी परत न आल्याने फिर्यादी यांची सासू व त्यांचे पती असे तिचा शोध घेऊ लागले. ते मंडणगड नगरपंचायतच्या ईमारतीच्या मागील बाजूस असणार्‍या देशी दारु दुकानाजवळ शोध घेण्यासाठी गेले असता, या दुकानाचे बाजूला असलेल्या
पडक्या चाळीच्या एका खोलीतून लहान मुलीचा मोठ्याने रडण्याचा आवाज त्यांना ऐकू येत होता. त्यामुळे फिर्यादी व त्यांचे सोबत असलेले सर्वजण धावत त्या खोलीत गेले असता फिर्यादी यांची लहान मुलगी पडक्या खोलीत एका लाकडी फळीवर झोपून रडत होती. या घटनेची फिर्याद मंडणगड पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली. त्यानंतर मंडणगड येथील पोलिसांनी संशयित आरोपी दिनेश बबन हिलम (रा. अडखळ आदिवासीवाडी ता मंडणगड जिल्हा रत्नागिरी) याचे विरोधात गुन्हा दाखल केला. त्याला घटनेच्या दुसर्‍या दिवशी पकडले. आरोपी याची अटकपुर्व वैद्यकीय तपासणी करुन ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळावी म्हणून पोलीस प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड पोलीस करीत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button