
पाच कोटी रुपये खर्च करून आणलेल्या घंटागाड्यांचे लोकार्पण झाले परंतु घंटागाड्यांना पासिंगची प्रतीक्षा.
रत्नागिरीं जिल्हा वार्षिक नियोजनमधून पाच कोटी रुपये खर्च करून प्रत्येक ग्रामपंचायतींना मिळालेल्या कचर्याच्या गाड्या सध्या एका जिल्हापरिषद शाळेबाहेर धूळखात पडल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यासह अन्य तालुक्यांच्या कचरा उचलणार्या घंटा गाड्या सच्या या परिसरात आरटीओ पासिंगनंतर, आपल्या ग्रामपंचायतीत जाण्याची प्रतीक्षा करत उभ्या आहेत. यातल्या बहुतांशी गाड्यांना आता गंज चढला असून आता या गाड्या अपेक्षित ग्रामपंचायतीत पोहोचवण्यासाठी त्यांची डागडुजी करण्याची गरज भासणार आहे. या डागडुजीकरीता पुन्हा एकदा जिल्हापरिषदेला नियोजन विभागातून लाखोंचा खर्च करावा लागणार आहे. जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींप्रमाणे ग्रामपंचायतींनाही कचरा उचलणार्या गाड्यांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील कचरा उचलण्यासाठी सुका आणि ओला कचरा असे वर्गीकरण करून दोन्ही प्रकारच्या गाड्या नुकत्याच वितरीत करण्यात आल्या. जिल्हां वार्षिक नियोजन २०२३-२४ मधून काही कोटी रुपये खर्च करून प्रत्येक ग्रामपंचायतीकरीता या दोन्ही प्रकारच्या गाड्यांचे वितरण करण्यात आले होते. या गाड्यांचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अगदी धुमधडाक्यात करण्यात आला होता, मात्र मागील दीड महिन्यांपासून या गाड्या कुवारबाव शाळेबाहेर आरटीओ पासिंगची वाट पाहत उभ्या आहेत.www.konkantoday.com