
मॅक्सी कॅब वाहनांमुळे राज्य सुरक्षित राहणार नाही;एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे.
राज्य सरकारने परिवहन क्षेत्रात राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी १०० दिवसाचा आराखडा तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये मॅक्सी कॅब सारखी वाहने रस्त्यावर आणण्याची घोषणा केली आहे.मात्र, मॅक्सीकॅब सारखी वाहने रस्त्यावर आल्यास महाराष्ट्र सुरक्षित आणि शाश्वत राहणार नाही.
किंबहुना एसटीसारखी सर्वात सुरक्षित सेवा कोलमडून पडेल असा दावा महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.मॅक्सी कॅब अर्थात खाजगी पद्धतीने होणाऱ्या वडाप सारख्या वाहतुकीचे नियमन करण्याच्या नावाखाली राज्य सरकारने १०० दिवसाचा आराखडा तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातून फारसे काही साध्य होणार नसून मॅक्सी कॅब सारख्या अशाश्वत वाहनांना अधिकृत करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे.




