आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, हा संजय राऊतांचा गुण-नितेश राणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज कोल्हापुरात होत असलेल्या प्रचारसभेवरून आज महायुती आणि महाविकसा आघाडीच्या नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली आहे. त्यात ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली आहे.नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधात प्रचारासाठी कोल्हापुरात आले होते हे महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही, भाजपा छत्रपतींच्या गादीचा अपमान करत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्या टीकेला आता भाजपा नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूरचा निकष लावत असाल तर साताऱ्यामध्ये उदयनराजेंविरोधात महाविकास आघाडीचे नेते प्रचार का करत आहेत, असा सवाल नितेश राणे यांची विचारला आहे.संजय राऊत यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, कोल्हापूरचा निकष लावत असाल तर महाविकास आघाडीचे नेते साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरोधात का प्रचार करत आहेत. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, हा संजय राऊतांचा खोटा गुण आहे. याच संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागितले होते. त्या कृतीसाठी संजय राऊत यांनी आधी माफी मागितली पाहिजे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button