टॅडेम सायकलवरून ७ राज्यांचा ४२ दिवसांचा प्रवास!


मे महिन्यात, उष्णतेचा कडाका आणि काही ठिकाणी पावसाने चिखल झालेले रस्ते तरीही हार न मानता पूर्व ते पश्चिम असा तब्बल ४२ दिवस १४ तासांचा सायकल प्रवास करणार्‍या सौ. डॉ. मनिषा गोपीचंद वाघमारे (वय ४६) यांचा चिपळूणच्या सावरकर हॉलमध्ये एका मांगल्यपूर्ण कार्यक्रमामध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटातर्फे या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. दोन धाडसी महिलांनी सात राज्यांतून प्रवास करत टँडेम प्रकारची सायकल चालवत इतिहास रचला. बेंगळुरूच्या शास्त्रज्ञ सौ. मिरा वेलणकर (वय ४९) आणि सौ. डॉ. मनिषा गोपीचंद वाघमारे दोघी मिळून एकाच सायकलवर समसमान लयीने पॅडलिंग करत सहकार्य, समर्पण आणि संयमाचे अनोखे उदाहरण त्यांनी देशासमोर ठेवले. हा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात प्रोजेक्टर प्रेझेंटेशनने झाली. ज्यामध्ये डॉ वाघमारे यांनी प्रवासातील थरारक  अनुभव, प्रेरणादायी प्रसंग आणि भेटलेल्या चांगल्या लोकांविषयी गौरवोद्गार काढले. माजी आमदार रमेशभाई कदम व राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस व उद्योजक प्रशांत यादव यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शिरीष काटकर यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाने सावरकर हॉलमधील प्रत्येक क्षण संस्मरणीय ठरला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button