मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेली कामे व धोकादायक वळणे याचा अभ्यास करण्यासाठी तरूण अभियंत्याची आगळी वेगळी मोहीम


तब्बल १७ वर्षाहून अधिक काळापासून अपूर्ण असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच ६६) अडथळे, रखडलेली कामे, जीवघेणे खड्डे, धोकादायक वळणे आणि अपघातप्रवण ठिकाणे यांचा प्रत्यक्ष अभ्यास करून शासनापर्यंत खरी वस्तुस्थिती पोहोचवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील तरूण अभियंता चैतन्य पाटील (गाव कासू, पेण) यांनी एक आगळीवेगळी मोहीम (पदयात्रा) सुरू केली आहे. त्यांनी या मोहिमेला अर्थपूर्ण नाव दिलंय, रस्ता सत्याग्रह-पायी पाहणी मोहीम.. ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी पनवेल, पळस्ते फाटा येथून सुरू झाली असून रायगड-रत्नागिरीमार्गे सिंधुदुर्गपर्यंत चालणार आहे. मंगळवारी चिपळूण येथे शिवसेना उबाठा गटाचे नेते, आमदार भास्करशेठ जाधव यांची भेट घेवून चैतन्य यांनी पुढचा टप्पा संगमेश्‍वच्या दिशेने सुरू केला. चैतन्यच्या या धाडसाचे आ. जाधव यांनी कौतुक करत त्यांच्या पाठीवर थाप देवून लढत रहा, असा सल्ला दिला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button