मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कोकणसाठी ४०० कोटींचा पाऊस!सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ला पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ*


  • कोकणच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ला पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी ४०० कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतजूही मंजूर करण्यात आली आहे.

या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन अधिक प्रभावी व्हावे यासाठी जिल्हा स्तरावरील या समितीचे अध्यक्षपद आता संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे सोपवण्यात आले आहे. कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून स्थानिकांचे दरडोई उत्पन्न वाढवणे, पर्यटन आणि मत्स्यव्यवसाय यांसारख्या प्रमुख क्षेत्रांचे आधुनिकीकरण करणे, हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button