
ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेल्या चिपळूण तालुक्यातील परशुराम डोंगरावर भीषण वणवा
ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेल्या चिपळूण तालुक्यातील परशुराम डोंगर परिसरात बुधवारी सायंकाळी भीषण वणव्याने थैमान घातले. या वणव्यात मोठ्या प्रमाणात जंगल पेटल्याने संपूर्ण परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून दूरवरूनही धूर स्पष्टपणे दिसत आहे. या वणव्यात शेकडो झाडे, झाडीझुडपे, गवत तसेच वनसंपदा जळून खाक झाली आहे. परिणामी या परिसरातील जैवविविधतेला मोठा फटका बसला असून, वन्यजीवांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी या डोंगरात वणवा लागला होता. त्यावेळी वनविभागाने पुढाकार घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने तो आटोक्यात आणला होता. मात्र वारंवार लागणार्या वणव्यामुळे निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.www.konkantoday.com




