
कोकणच्या हापूसवर गुजरातचा दावा, भाजप नेते नितेश राणेंची प्रतिक्रिया
महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचे आरोप होत असताना आता त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडलीय. पण यावेळेस प्रकल्प नव्हे तर कोकणच्या प्रसिद्ध हापूस आंब्याची चर्चा आहेगुजरातने हापूस आंब्यावर दावा केलाय, त्यामुळे कोकणकरांमध्ये संतापाची लाट पसरलीय. कोकणचे नेते, मंत्री नितेश राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.कुणीही दावा करू शकतो, त्यात काहीच अडचण नाही. मात्र, आमच्या कोकणातील हापूस आंब्याच्या हक्कासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. केंद्रात राणे साहेब, सुनील तटकरे साहेब यांसारखे नेते आहेत. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकजुटीने या आंब्याच्या बाजूने उभे राहू आणि त्याचे संरक्षण करू’,अशी पहिली प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. हापूस आंबा जगभरात, विशेषतः अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात लोकप्रिय आहे, आणि हा दावा कोकणच्या अर्थव्यवस्थेला धक्का देऊ शकतो, असेही ते पुढे म्हणाले.




