झुरिच, स्वित्झर्लंड येथे “ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६” या जागतिक परिषदेस महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांची उपस्थिती


झुरिच, स्वित्झर्लंड येथे सकाळ माध्यम समूहाच्या वतीने “ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६” या जागतिक परिषदेस महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत आज उपस्थित होते.

सकाळ माध्यम समूह यांच्या वतीने झालेल्या या परिषदेने महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी जागतिक संधींचे नवे दालन खुले केले.या परिषदेस महाराष्ट्राच्या विविध भागांतून 80 पेक्षा अधिक उद्योजकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. महाराष्ट्र सरकार उद्योजकांना केवळ गुंतवणुकीसाठी आमंत्रण देत नाही, तर धोरणात्मक सहकार्य, सुलभ परवानग्या, पायाभूत सुविधा आणि उद्योगपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. औद्योगिक धोरण, स्टार्टअप इकोसिस्टम, MSME साठी विशेष सवलती, तसेच जागतिक गुंतवणूकदारांसोबत भागीदारीसाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी अधोरेखित केले.

महाराष्ट्रात लॉजिस्टिक्स, उत्पादन, तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, संरक्षण उत्पादन, कृषी प्रक्रिया आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून, राज्य सरकार ‘Ease of Doing Business’ च्या माध्यमातून उद्योजकांचा प्रवास अधिक सुलभ करत असल्याचे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.

उद्योजकांनी केवळ स्थानिक नव्हे तर जागतिक बाजारपेठेचा विचार करून पुढे यावे, शासन त्यांच्यासोबत भागीदार म्हणून उभे राहील, असा विश्वास यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास सकाळ माध्यम समूहाच्या जान्हवी पवार, राहुल पवार, ‘साम’चे मुख्य संपादक निलेश खरे, सकाळच्या कार्यकारी संपादिका शितल पवार, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उद्योजक उपस्थित होते.

ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६ ही परिषद महाराष्ट्रातील उद्योगविश्वाला जागतिक स्तरावर जोडणारा प्रभावी मंच ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button