संविधान जागर विचारमंचच्यावतीने रत्नागिरीत ७ रोजी राष्ट्रीय संविधान परिषद


संविधान जागर विचारमंचच्यावतीने ७ डिसेंबर रोजी शहरातील सावरकर नाट्यगृह येथे राष्ट्रीय संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उदघाटन माजी खासदार व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार आहे. तसेच नितीन चंदनशिवे, पत्रकार संजय आवटे, प्राध्यापिका सुचिता गायकवाड, न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अशी माहिती परिषदेचे समन्वयक प्रा. दत्तात्रय कांबळे यांनी दिली.
परिषदेला सकाळी प्रारंभ होणार असून ८.३० ते १० या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडून संविधान दिंडी काढण्यात येणार आहे. परिषदेचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता डॉ. जाधव यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थान माजी न्यायमूर्ती ठिपसे भूषवणार आहेत. रात्री ७ वाजता ’शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button