
प्रजासत्ताक दिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील ६ बेटांवर पोलीस दलातर्फे करण्यात आले ध्वजारोहण
रत्नागिरी :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी DGP-IGP परिषद 2024 मध्ये सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील निर्जन (Uninhabited) बेटांवर दरवर्षी दिनांक १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण करावे तसेच त्या ठिकाणी रात्र वास्तव्य करावे, असे निर्देश महाराष्ट्र पोलीस दलाला दिलेले आहेत.


त्या अनुषंगाने, प्रजासत्ताक दिन २०२६ च्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी हद्दीत असलेल्या बेटांवर रत्नागिरी पोलीस दलामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात आला.


रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १५ बेटे असून त्यापैकी २ बेटे मनुष्यवस्तीची व १३ बेटे निर्मनुष्य आहेत. या पैकी खालील नमूद ६ बेटांवर दिनांक २६ जानेवारी रोजी यशस्वीरित्या ध्वजारोहण करण्यात आले.
सुवर्ण दुर्ग किल्ला (बेट), हर्णे, दापोली, बाबा मलंग दर्गा, खेड, जुवाड पेठ बेट, गोवळकोट, चिपळूण, जुव्याचे पेंद, कुरधुंडा, संगमेश्वर, जुवे बेट, बुरंबेवाड, नाटे, वाकडवन, कोंडसर,




