
संगमेश्वर तालुक्यातील सोनवी आणि शास्त्री नद्यांच्या संगमावर असलेला गाळ उपसा करण्याचे काम पुन्हा सुरू
संगमेश्वर तालुक्यातील सोनवी आणि शास्त्री नद्यांच्या संगमावर असलेला गाळ उपसा करण्याचे काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे पावसाळ्यात संगमेश्वर बाजारपेठेला बसणारा पुराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोन वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागामार्फत बावनदीतील गाळ उपसा करण्यात आला होता. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला होता. त्यामुळे बाजारपेठेतील पूरस्थितीवर नियंत्रण मिळाले होते. मात्र त्यानंतर पुलाचे काम सुरू झाल्याने उत्खननातून निघालेली माती पुन्हा नदीपात्रात गेली. परिणामी नदीत गाळ साचून पुन्हा पूरधोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ही बाब लक्षात घेऊन आता पुन्हा जोरात गाळ उपसा सुरू करण्यात आला आहे. हे काम काही काळ बंद करण्यात आल्याचे समजल्यानंतर माभळे गावचे सरपंच, व्यापारी संघटनेचे वरिष्ठ सदस्य तसेच ग्रामस्थांनी प्रत्यक्ष नदीपात्रावर जाऊन पाहणी केली. नाळ उपसा प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनासह सर्व स्तरातून सहकार्य करायाची मागणी यावेळी करण्यात आली.
www.konkantoday.com




