
जयगड निवळी रस्त्यावर भोके मासेबाव येथे रिक्षा उलटून चारजण जखमी
रत्नागिरी तालुक्यातील जयगड निवळी रस्त्यावरील भोके मासेबाव येथे रिक्षा उलटून चारजण जखमी झाले. ही घटना सोमवार १९ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. आशिष नारायण साळुंखे (३०), मयुर जामसुतकर (३७), रणजीत सुतार (३७), अमेय कुळे (५१, रा. कोंड्ये, चिपळूण) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आशिष साळुंखे व इतर ३ हे सोमवारी रिक्षाने एका कार्यक्रमासाठी कोंढये चिपळूण येथून रत्नागिरी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे येत होते. गुहागर आबलोली मार्गे येत असताना भोके मासेबाव येथे चालक आशिष साळुंखे याचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटली. अपघातात चौघांना दुखापत झाली.www.konkantoday.com




