दापोली आगाराच्या एका वाहकाच्या विकृतपणामुळे महिला आणि युवती प्रवासी त्रस्त


ठाकरे सेनेचे दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांचा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा


दापोली येथील आगारातील एका वाहकाने चार दिवसांपूर्वी दापोली-रत्नागिरी या गाडीतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाला चिपळूण स्थानकात हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी चिपळूण स्थानकावर प्रवासी आणि नागरिकांनी त्याला चांगला चोप दिल्याची घटना घडली आहे.
या वाहकाने दीड महिन्यापूर्वी दापोली एसटी स्टँडवर एका युवतीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला असतानाच दापोली बस स्थानकावर देखील नागरिकांनी त्याला चांगला चोप दिला होता.
चिपळूण बसस्थानक येथे विनयभंग केल्यानंतर या वाहकाला चालक पदावर नियुक्त करण्यात आले; मात्र चालक म्हणून दापोली-पांगरी गाडी घेऊन जात असताना दोनच दिवसांपूर्वी त्याने गाडीचा अपघात केल्याची घटनाही घडली आहे.
या वारंवार महिला वर्गाला त्रास देणाऱ्या चालक वाहकाबद्दल कोणतीही महिला आणि युवती ही पोलिसात तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे याच्यावर कोणतीही कारवाई करण्यास प्रशासन असमर्थ असल्याची माहिती प्राप्त होत आहे.
शिवसेना महिला आघाडीचा एसटी प्रशासनाला बांगड्या भेट देण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष ममता मोरे यांनी दिली आहे.
विकृत मनोवृत्तीच्या या वाहकाच्या कारवायांविरोधात आज (८ मे) मे रोजी उबाठा सेनेचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख ज्योती विचारे, माजी नगराध्यक्ष ममता मोरे, तालुकाप्रमुख सिंधु भाटकर, जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बंटी मोरे, शहर प्रमुख संदीप चव्हाण, विकी गवळी, प्रदीप गमरे यांनी आक्रमक भूमिका घेत दापोली एसटी आगाराच्या प्रमुखांना आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button