
चिपी विमानतळावरून रात्रीचे उड्डाण यशस्वी, मुंबईकडे विमान रवाना
चिपी-सिंधुदुर्ग विमानतळाच्या इतिहसात एक महत्वाचा टप्पा गाठत शुक्रवारी रात्री खासगी चार्टर्ड विमानाने पहिले आयएफआर रात्रीचे उड्डाण यशस्वीरित्या केले. रात्री ८ वाजता हे विमान चिपी विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाले. यामुळे सिंधुदुर्ग विमानतळावर पहिल्या आयएफआर नाईट फ्लाईंगची नोंद झाली आहे.
अलिकडेच चिपी विमानतळावर नाईट लँडींगची सुविधा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्षात रात्रीच्या वेळी टेकऑफ किंवा लँडींग सुविधा सुरू झाल्यानंतरचे हे पहिलेच आयएफआर उड्डाण असल्याचे विमानतळ प्रशासन, तांत्रिक कर्मचारी आणि स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रात्रीच्या उड्डाणामुळे भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला अधिक विमानसेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.www.konkantoday.com




