संगमेश्‍वर-कोल्हापूर राज्य महामार्गावर लोवलेत वणव्यामुळे पाईपलाईन, केबलचे नुकसान

संगमेश्‍वर-कोल्हापूर राज्य महामार्गावर लोवले येथे लागलेल्या वणव्यामुळे बीएसएनएलच्या केबलचे आणि पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले.संगमेश्‍वर-कोल्हापूर राज्य मार्गावर करंबेळे येथे वणव्यामुळे वडाचे झाड कोसळले होते. त्यामुळे वाहतुक कोंडी झाली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी लोवले थांब्यानजिक लावलेल्या आगीमुळे बीएसएनएलची केबल खाक झाली. तसेच कॉलेजला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जळून मोठे नुकसान झाले. दरवर्षी रस्त्याच्या कडेला वणवा लागला जातो. त्यामुळे मोटे नुकसान होते. वणवे लागणार्‍यावर कारवाईची मागणी होत आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button