
मुंबई- सीएसएमटी या एक्प्रेस गाडीतून आवाज करणाऱ्या दोन महिला प्रवाशांचे दागिने चोरट्याने लांबविले
कोकण रेल्वे मार्गावरील तालुक्यातील दिवाणखवटी रेल्वे स्थानकाच्या अलीकडे मुंबई – सीएसएमटी एक्स्प्रेस गाडी थांबलेली असताना एका अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या १ लाख २९ हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या मंगळसुत्रासह रोख रक्कम रुपये १५०/- अशा २ लाख १९ हजार १५० रुपयांच्या मुद्देमालाची चोरी करून पोबारा केला तर याच स्थानका नजीक आणखी एक चोरीची घटना घडून यात १९ हजार रुपये किमतीची सोन साखळी अज्ञात चोरट्याने लांबवली
चोरीच्या घटना ३१ मे २०२५ रोजी रात्री २:५५ वाजता घडल्या आहेत चोरीच्या घटना ची नोंद ४ जुन रोजी खेड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
खेड पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- सीएसएमटी या एक्प्रेस गाडीतून फिर्यादी महिला कोच नं. एल-४, सीट नंबर ६१ वरून झोपून प्रवास करताना गाडी दिवाणखवटी रेल्वे स्थानकाच्या अलीकडे रात्री २:४० वाजता थांबलेली असताना फिर्यादी महिला यांच्या गळ्यातील १ लाख २९ हजार रुपये किंमतीचे ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व दुसरे ९० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र अशा दोन्ही मंगळसूत्रांसह रोख रक्कम रुपये १५०/- असा एकूण २ लाख १९ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने अंधाराचा फायदा घेऊन खिडकीतून पळून गेला
तर याच गाडी तुन एका महिलेची १९ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन घेऊन खिडकीतून अज्ञात चोरट्याने पोबारा केला अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.