काजू बोंडापासून देवरूखमधील निखिल कोळवणकर यांनी बनवले इन्स्टन पेय
कोकणात काजूपासून बी व काजू टरफलापासून तेल काढणे असे प्रक्रिया उद्योग सुरू आहेत. परंतु ९० टक्के काजूची बोंडे फेकून दिली जातात. या वाया जाणार्या काजू बोंडापासून देवरूखमधील निखिल कोळवणकर यांनी इन्स्टन पेय तयार केले आहे. काजू बोेंड हे अनेक पोषणमूल्यांनी युक्त आहे. कमी खर्चात शरीराला आवश्यक घटक युक्त असे हे पेय असल्याचे कोळवणकर यांनी सांगितले.
काजू हे कणखर फळफिक असून काजूगराच्या निर्यातीतून भारताला परकीय चलन मिळते. बोंडाचे उत्पादन काजू बीया पाचपट होते. ते पुरेसा वापर नसल्याने वाया जात आहे. काजू बोंड हे अनेक पोषणमूल्यांनी युक्त आहे. काजू बोंडापासून अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणे शक्य आहे.
काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. महाराष्ट्र शासनाच्या फळबाग लागवड योजनेमुळे काजू पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. कोकणात काजूपासून बी व काजू टरफलापासून तेल काढणे असे प्रक्रिया उद्योग सुरू असले तरी सुमारे ९० टक्के काजूची बोंडे फेकून दिली जातात. गोवा सरकारने काजूपासून अल्कोहोल पेय करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे गोव्यात काजू बोंड वाया जात नाही. परंतु कोकणात मोठ्या प्रमाणात काजू बोंडे वाया जातात. www.konkantoday.com