हर्णै दापोली येथे घरफोडी, १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास
दापोली तालुक्यातील हर्णै ब्राह्मण आळीत राहणारे परेश काळपाटील यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडून १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. फिर्यादी काळपाटील यांचे हर्णै ब्राह्मणवाडी येथे राहते घर आहे. हे घर बंद होते. अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले ७१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरी झाल्याची घटना उघड झाल्यावर फिर्यादी यांनी दापोली पोलीस स्थानकात चोरीची फिर्याद दिली आहे.
www.konkantoday.com