
राजापूर तालुक्यातील मिळंद राववाडीत ३० कुटुंबांचा एक गणपती
राजापूर तालुक्यातील मिळंद राववाडी येथे ३० कुटुंबांनी एकच गणपती आणण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालू ठेवली आहे. नवीन घर बांधले तरीही ते कुटुंब नव्याने गणेशमूर्तीची स्थापना न करता मूळ घरातील गणपतीच्या आराधनेसाठी एकत्र येतात. हा गणेशोत्सव विभक्त कुटुंबपद्धतीच्या आजच्या आधुनिक पिढीला एकतेचा संदेश देणारा आहे.
समाजात वावरताना सण, उत्सव साजरे करताना ते एकमताने एकोप्याने साजरे करावेत. त्यातून एक चांगला संदेश समाजात पसरवावा, या प्रमुख उद्देशाने लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना अस्तित्वात आणली. ती सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुरू आहे; मात्र कोकणामध्ये घरोघरी गणेशमूर्ती आणण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे.
राजापूर तालुक्यातील मिळंद राववाडी येथे विश्वासराव बंधूंच्या मूळ घरामध्ये कुटुंबे वेगळी झाली तरी त्यांनी आपल्या नवीन घरामध्ये गणपतीची मूर्ती न आणता वाडवडिलांपासून चालत आलेली प्रथा जपली आहे. त्यामुळे ३० कुटुंबांचा एकच गणपती आहे.www.konkantoday.com




