रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळेत विहिरीत आढळला ठेकेदाराचा मृतदेह
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे हनुमाननगर येथे विहिरीमध्ये ठेकेदाराचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास उघडकीस आली. ऋद्राप्पा विरूक्षप्पा इंडिगिरी (६०, रा. मिरजोळे हनुमाननगर) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋद्राप्पा हे रत्नागिरीत ठेकेदार म्हणून काम करत असत. रत्नागिरी शहरात तसेच जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिक म्हणून ते परिचित होते. रविवारी दुपारी ऋद्राप्पा हे जेवण करून घराचे अंगणात फेर्या मारत होते. त्यानंतर ते अचानक कुठे निघून गेले. हे कुणाला समजून आले नाही. दरम्यान नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी ऋद्राप्पा यांचा मृतदेह शेजारील विहिरीत आढळुन आला, अशी नोंद शहर पोलिसांत करण्यात आली आहे. www.konkantoday.com