
नागरिकांनो काळजी घ्या ! – उष्णतेत होणार वाढ, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
उन्हाचा कडाका चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच देशभरात आता मार्च ते मे दरम्यान उष्णता अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.महाराष्ट्रात देखील उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मार्चच्या सुरुवातीच्या दिवसात राज्यातील अंतर्गत भागात 2-3 अंशांनी तापमान वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
*उन्हाळ्यात ‘या’ गोष्टींची काळजी घ्या*
▪ हलके, हलक्या रंगाचे, सैल सुती कपडे घालावेत.
▪ उन्हात बाहेर जाताना गॉगल, छत्री/टोपी, व चप्पल वापरावी.
▪ पुरेसे आणि शक्य तितक्या वेळा पाणी प्यावे
▪ हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे




