खेकडा शेतीतून स्वयं-रोजगाराची संधी : डॉ. केतन चौधरी


सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात खेकडा पालन प्रशिक्षण


रत्नागिरी : “महाराष्ट्र व गोवा राज्यात खेकड्याला फार मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे खेकडा पालन व्यवसायाला मोठे भविष्य आहे. तसेच खेकडे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भविष्यात खेकडा पालन हा प्रकल्प पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेत समावेश केल्यास खेकडा शेतीतून स्वयं-रोजगार संधी आणि पर्यावरण पूरक व्यवसाय उपलब्ध होईल,” असे प्रतिपादन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) अंतर्गत येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात “खेकडा पालन : व्यवस्थापन” या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम झाले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रशिक्षणासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे व विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्रस्तावना सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. आसिफ पागरकर यांनी केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन केंद्राचे माजी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुरेश नाईक उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये खेकडा पालन या उद्योगाला यशस्वी होण्यासाठी सुरक्षितपणे खेकडा पकडता येणे आवश्यक असल्याचे नमूद करताना सर्वांनी एकत्रित होऊन खेकडा समुदाय गट तयार केल्यास या उद्योगाला कसा फायदा होईल याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी खेकडा पालनातील आपले अनुभव कथन केले.

बर्डेझ (गोवा) प्रादेशिक कृषी कार्यालयाच्या कृषी अधिकारी पूजा महालकर, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे अभिरक्षक डॉ. हरीश धमगाये, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले, जीवशास्त्रज्ञ वर्षा सदावर्ते उपस्थिती होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ संशोधन सहाय्यक अपूर्वा सावंत यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. सचिन साटम यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता गोवा व महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

या दोन दिवसीय प्रशिक्षण दरम्यान खेकड्यांच्या विविध जातींची ओळख व जीवनचक्र’ आणि ‘खेकडा पालनः विविध पद्धती’ याविषयी श्रीमती वर्षा सदावर्ते, तर ‘खेकडा पालन व्यवस्थापन संच निर्मिती आराखडा’ आणि ‘जिवंत खेकडा पालन : हाताळणी आणि व्यवस्थापन’ याविषयी डॉ. हरीष धमगाये यांनी मार्गदर्शन केले. ‘खेकडा पालन : पाण्याचे गुणधर्म, पाण्याचे व्यवस्थापन’ याविषयी श्रीमती अपूर्वा सांवत, ‘खेकडा खादय व्यवस्थापन’ आणि ‘खेकडा पालन : विक्री व्यवस्थापन’ याविषयी श्री नरेंद्र चोगले, ‘खेकडा पालन : काढणी आणि बांधणी (प्रात्यक्षिक) व्यवस्थापन” याविषयी सचिन साटम, ‘खेकडा पालन : रोग आणि व्यवस्थापन’ याविषयी डॉ. आसिफ पागारकर आणि ‘खेकडा पालन : प्रकल्प अहवाल आणि अर्थशास्त्र’ याविषयी डॉ. के. जे. चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
प्रत्यक्ष या व्यवसायामध्ये काम करीत असलेले गोवा येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे माजी विद्यार्थी शुभम पवार यांनी ऑनलाईन गुगलमिटद्वारे खेकडा संच प्रत्यक्ष हाताळणी विषयी प्रात्यक्षिकासह अनुभव कथन केले. रत्नागिरीतील जफर वाडकर यांनी खेकडा पालन व्यवसायातील स्व: अनुभव कथन करून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोपप्रसंगी प्रादेशिक कृषी कार्यालयाच्या (बर्डेझ, गोवा) कृषी अधिकारी श्रीमती पूजा महालकर यांनी गोव्यातील प्रशिक्षणार्थी शेतकरी खेकडा पालन व्यवसाय सुरु करण्याबाबत ग्वाही दिली आणि प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
प्रशिक्षणार्थी रूपेश ताम्हणकर, श्रीमती गौरी मायनाक यांनी मनोगत व्यक्त केले.
हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश सावर्डेकर, श्रीकांत तांबे, जाई साळवी, दिनेश कुबल, महेश किल्लेकर, मनीष शिंदे, राजेंद्र शिरगावकर, भूमी भाटकर, सुहास कांबळे, सचिन चव्हाण, राजेंद्र कडव, प्रवीण गायकवाड तसेच कंत्राटी मजूर तेजस जोशी, योगेश पिलणकर, अभिजीत मयेकर, श्री. पेडणेकर, प्रशांत पिलणकर, केतन चव्हाण आणि दर्शन शिंदे यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button