वीज बिल कमी करण्यासाठी चिपळुणतील नाट्यगृहासाठी उभारणार सौरऊर्जा प्रकल्प
अनेक वर्षानंतर सुरू करण्यात आलेल्या शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे वीजबिल कमी करण्यासाठी आता ७० किलोवॅट क्षमतेचा पारेषण संलग्न सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प साकारण्यात येणार आहे. तसेच येथे सोलर पॅनलही बसवले जाणार असून त्यासाठी छताची दुरूस्ती केली जाणार आहे. या कामांसह अन्य सुमारे २ कोटी ५० लाख रुपयांच्या विकासकामांची पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते १३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता भूमिपूजने होणार आहेत.अनेक वर्षानंतर नाट्यगृह सुरू करण्यात आले आहे. मात्र वातानुकुलीत असलेल्या नाट्यगृहाचे कार्यक्रमाचे भाडे पाहता येणारे वीजबिल व अन्य खर्च भागवणे कठीण बनणार आहे. त्यामुळे पुन्हा नाट्यगृह पांढरा हत्ती बनून बंद पडू नये म्हणून नगर परिषद प्रशासन त्याला फायद्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. www.konkantoday.com