
मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजिक स्वीफ्ट कारच्या धडकेने मुलीचा जागीच मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. रायगड जिल्ह्यातील महाडनजिक स्वीफ्ट कारच्या धडकेने मुलीचा जागीच मृत्यू झाला. शरण्या दवंडे असे मृत मुलीचे नाव आहे. अपघातानंतर पलायन करणार्या फरहान अब्दुल कादिर ताजीर (रा. अप्पर तुडील-महाड) चालकाला ग्रामस्थांनी शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेने वातावरण तंग झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला.
शरण्या आणि तिचा भाऊ शिवम (९) हे दोघे रस्त्याच्या कडेला पायी चालत होते. कारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत पायी चालणार्या दोघांना धडक दिली. या अपघातात चालक घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आजूबाजूला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्याला वेळीच पकडले.
www.konkantoday.com




