चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षपदी राखी आडवीलकर


चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या चिपळूण तालुकाध्यक्षपदी राजेश केळस्कर, तर महिला तालुकाध्यक्षपदी शिरगावच्या सुकन्या उर्फ राखी विनय आडवीलकर यांची निवड जाहीर करण्यात आली. पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा दीपिका कोतवडेकर यांनी या नियुक्तीची घोषणा केली. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राखी आडवीलकर यांना लहानपणापासूनच समाजसेवेची आवड होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी फोटोग्राफी व्यवसाय सुरू केला. त्याचबरोबर महिलांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्या सक्रियपणे कार्यरत राहिल्या. त्यांच्या सामाजिक कार्यात पती विनय आडवीलकर यांचीही मोलाची साथ लाभली.

त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा दीपिका कोतवडेकर यांनी त्यांचा पक्षात प्रवेश करून घेत चिपळूण महिला तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. नुकतीच त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रईस अलवी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश सावंत, सेवा दल जिल्हाध्यक्ष याकुब खान, ओबीसी जिल्हाध्यक्ष वासू आप्पा सुतार, जिल्हा उपाध्यक्ष अशपाक तांबे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पवार, तालुकाध्यक्ष राजेश केळस्कर, युवक कार्याध्यक्ष अक्षय केदारी, नियाज सनगे, जिल्हा सरचिटणीस नसीम सय्यद, जिल्हा सचिव मिनल बांदेकर, जिल्हा सदस्य सोनिया लोहिया, उपशहराध्यक्षा दीपिका कोतवडेकर, नगरसेविका नसरिन खडस तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button