
अमरदीप परचुरे यांची राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेच्या जि.प. समितीवर नियुक्ती
आबलोली (संदेश कदम) : राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार गुहागरचे तरुण तडफदार व्यक्तिमत्व व शिवसेनेच्या युवा सेना तालुकाप्रमुख पदाचे गेले ६ वर्ष समर्थपणे जबाबदारी पेलणारे युवा सेनेचे जिल्हा समन्वयक, अमरदीप दीपक परसुरे यांची राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेच्या जिल्हा परिषद समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अमरदीप परचुरे यांनी कला विकास रंगभूमी गुहागर, गजानन नाट्य समाज यांच्या माध्यमातून उत्सवांमध्ये सादर होणाऱ्या नाटकांमध्ये अभिनय, नेपथ्य, पार्श्वसंगीत आदी क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे. ते सध्या श्री देव व्याडेश्वर देवस्थान गुहागरमध्ये काम करीत आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषद चिपळूण शाखेचे संचालक असून जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन या संस्थेचे ते सदस्य आहेत.
या नियुक्तीने संपूर्ण गुहागर तालुक्यामधून विविध सामाजिक, राजकीय स्तरावरून अमरदीप परचुरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.




