
जि. प. पंचायत समिती निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी मतदान दिवशी आठवडा बाजार बंद.
रत्नागिरी, दि.5 )- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी शनिवार 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदानाच्या दिवशी जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्याठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे यासाठी बाजार व जत्रा अधिनियम 1862 चे कलम 5 (ग) (क) मधील तरतुदीनुसार आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. सदर आदेशानुसार जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी, संगमेश्वर तालुक्यातील माखजन व रत्नागिरी तालुक्यातील निवळी आणि रत्नागिरी शहर येथील आठवडा बाजार शनिवार 7 फेब्रुवारी 2026 रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत.




