रिसॉर्टचीरूम रूम बुक करण्याच्या बहाण्याने खेडमधील डॉक्टरला ऑनलाइन गंडा


खेडमध्ये डॉक्टरला ऑनलाईन हजारोंचा गंडा
हॉटेलचा व्यवस्थापक असल्याचे सांगून खेड शहरातील एका रूग्णालयातील डॉक्टरला अज्ञाताने ९० हजार ६२८ रूपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी संतोषकुमार खंदाडे यांनी येथील पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा. घडल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.
संतोषकुमार खंदाडे यांनी लोणावळा येथील ड्युक्स रिट्रिक रिसॉर्ट नावाच्या हॉटेलचे रूम बुक करण्यासाठी हॉटेलच्या वेबसाईटवरील मोबाईल नंबरवर संपर्क केला. रूम बुकींग करत असताना अज्ञाताने हॉटेलचा व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून त्याचा विश्‍वास संपादन केला. यानंतर व्हॉटसअपद्वारे एच.डी.एफ.सी. बँकेच्या खात्यावर २४ हजार ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. यानंतरही त्यांचा अधिकचा विश्‍वास संपादन करत हॉटेल बुकींग रजिस्ट्रेशन पावतीवरील कोड गुगलवरती टाकण्यास सांगून बँक ऑफ इंडिया बँकेच्या खात्यातून १९ हजार ७७ रुपये व २३ हजार ५५१ रुपये डेबीट करून तब्बल ९० हजार ६२८ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button