भगवती बंदरात लग्झरी क्रूज थांबणार ?
मुंबई गोवा अशी सुरू झालेल्या लक्झरी क्रूझला रत्नागिरीत थांबा मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत याचाच एक भाग म्हणून मुंबई मेरिटाईम बोर्डाकडून एका कंपनीद्वारे भगवती बंदर परिसरात नुकताच एक सर्व्हे करण्यात आला याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला असून त्यानंतर या क्रूझला रत्नागिरीत थांबा देण्याबाबत विचार होईल असे कळते.