मुंबई – गोवा महामार्गावरील वेरळ नजीक अपघातात जखमी दुचाकीस्वाराचा उपचारांदरम्यांन मृत्यू

खेड : मुंबई गोवा महामार्गावर तीन वाहनांना कंटेनरने दिलेल्या धडकेत पाचजण जखमी होण्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा महामार्गावरील वेरळ येथे कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे उपचारांदरम्यान निधन झाले. संदेश सुरेश बुटाला असे या दुर्दैवी दुचाकीस्वाराने नाव असून तो खेड येथील आहे.

खेड शहरात राहणारे संदेश बुटाला हे आपल्या दुचाकीने मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ परिसरात गेले असतात महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरची त्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात रस्त्यावर आदळल्याने संदेश बुटाला यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची खबर मिळताच १०८ क्रमांकांच्या रुग्णवाहिकेचे चालक बावा चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या संदेश बुटाला यांना तात्काळ नजीकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दुचाकीला धडक दिल्यानंतर कंटेनर चालक न थांबत अपघातस्थळावरून सुसाट वेगाने गोवा दिशेकडे निघून गेला मात्र लोटे औद्योगिक परिसरात पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला अडविण्यात यश आले.

मुंबई गोवा महामार्गावर दर दोन दिवसांआड कधीकधी दार दिवशी जीवघेणे अपघात होऊ लागले असल्याने महामार्गावरून वाहने हाकायची कशी हा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम, ठिकठिकाणी खड्ड्यात गेलेला रस्ता, महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना रस्त्याची न राखलेली लेव्हल यामुळे मुंबई गोवा महामार्ग हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा होऊ लागला आहे.
महामार्गावरून प्रवास करताना काळ कधी झडप घालेल आणि कधी होत्याचे नव्हते करेल हे सांगणे कठीण होऊन बसले असल्याने महामार्गावरून प्रवास करताना वाहन चालक आणि प्रवाशी यांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागतो.

खेड पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button