लोटे येथील मुक्तीधा गो शाळेचा केवळ भास्करशेठ जाधव यांच्याच कार्यकर्त्यांना त्रास का होतो गोशाळा संचालक ह.भ.प. कोकरे महाराज यांचा सवाल

लोटे येथील मुक्तीधा गो शाळेचा केवळ भास्करशेठ जाधव यांच्याच कार्यकर्त्यांना त्रास का होतो, असा सवाल करीत शिवसैनिकांकडून होणारा हा त्रास थांबला नाही, तर आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती गो शाळेचे संस्थापक, संचालक ह.भ.प. कोकरे महाराज यांनी दिली आहे. चिपळूण शहरातील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले की ही गो शाळा अनधिकृत म्हणण्याचा कसलाही अधिकार कुणाला नाही. शासनाच्या संबंधित  विभागाकडून रितसर परवानगी घेण्यात आली आहे. शासकीय निधीही खर्च झाला आहे. आमदार भास्करशेठ जाधव यांनी गो हत्येच्यासंदर्भात गो शाळेविषयी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केल्यानंतर त्यांच्या येथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून त्रास होत असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांची नावेही सांगितली. मला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न झाला तरी मी माझे काम बंद ठेवणार नाही. आज हजाराहून अधिक गायी सांभाळण्याचे काम मी करीत आहे. परंतु सोनगावमधील काही ग्रामस्थांनी आपल्याला गणेश विसर्जनाच्या दिवशी पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या पत्नीलाही धक्काबुक्की केली, असा गंभीर आरोपही कोकरे यांनी केला आहे.
मी गोशाळेसाठी मरायला तयार आहे. विनाकारण त्रास देवू नका, मी कधीही गोशाळेतील गायी कोण सांभाळत असेल तर द्यायला तयार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button