लांजा उड्डाणपुलाच्या सैल प्लेट्सवर अखेर सॉइल नेलिंगचा उपाय


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहरातील उपशेट्येवाडी येथील उड्डाणपुलाच्या भिंतीच्या सिमेंट कॉंक्रीट प्लेट्स गेल्या महिन्यात अचानक सैल होऊन बाहेरील बाजूला सरकल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. अखेर या घटनेची दखल घेत संबंधित ठेकेदार कंपनीने सॉइल नेलिंगचे काम सुरू केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे लांजा शहरातील रखडलेले काम गेल्या काही काळापासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. त्यातच उड्डाणपुलाच्या भिंतीला बसविण्यात आलेल्या सिमेंट कॉंक्रीटच्या प्लेट्स जागेवरून सरकून बाहेरील बाजूला आल्याचे गेल्या महिन्यात निदर्शनास आले होते. त्यामुळे उड्डाणपुलाच्या मजबुतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रकारानंतर, नागरिक तसेच वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कोट्यवधी रुपये खर्च करूनही महामार्गाचे काम निकृष्ट दर्ंजाचे होत आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला होता. लांजा शहरातील सर्व्हिस रोडवरील खड्डे, फुटपाथ, गटारे, अंडरपास यांसह विविध समस्यांमुळे नागरिक आधीच त्रस्त असताना उड्डाणपुलाच्या प्लेट्स सरकण्याचा प्रकार वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर ठरला होता. या पार्श्वभूमीवर ठेकेदार कंपनीने अखेर उपाययोजना सुरू केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button