’टपरीमुक्त’ रत्नागिरीसाठी धडक मोहीम, चर्मालय परिसरातील १७ टपरीधारकांना नोटिस


रत्नागिरी शहरातील रस्ते आणि पदपथांवरील अनधिकृत टपर्‍या, खोकी व गाड्यांविरोधात नागिरी नगरपालिकेने पुन्हा धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारं आठवडा बाजार परिसरातील पाच अनधिकृत टपर्‍या जप्त करण्यात आल्या, तर अन्य टपरीधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटविली. चर्मालय परिसरातील १७ टपरीधारकांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, त्यांनीही स्वतःहून टपर्‍या हटविण्याचे मान्य केले आहे.
शहरातील रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून, त्यानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ही कारबाई पुन्हा सुरू झाली आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात साळवी स्टॉप ते मारुती मंदिरदरम्यानची अतिक्रमणे हटविण्यात आली होती. त्यानंतर सर्वसाधारण सभा आणि शासकीय मुद्यांमुळे कारवाई काही काळ स्वत है| हरविली वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली स्थगित होती.
पुन्हा सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मंगळवार आठवडा बाजार परिसरातील अनधिकृत टपर्‍यांवर कारवाई करीत पाच टपर्‍या जप्त करण्यात आल्या. उर्वरित टपर्‍या व खोकी संबंधितांनी मालमत्ता विभागाचे अधिकारी विजय कदम, आनंद थोरात आणि जितेश पवार यांच्या नेतृत्वाखाली ही| कारवाई करण्यात आली. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button