
दापोली दाभोळ येथे रेशन दुकानातील सवलतीच्या धान्याचा अपहार ,दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील दाभोळ येथे रेशन दुकानातील ९३हजार रुपये किमतीच्या सवलतीचे धान्य लाभार्थी कुटुंबाला दिले नाही लाभार्थींसाठी आलेल्या गहू व तांदूळ यांचा अपहार केला व शासनाची फसवणूक केली म्हणून अंजली माता स्वयंसहाय्यता महिला बचत गटाचे व्यवस्थापक विजय रामचंद्र बाेरघरे व धान्य विक्रेती अस्मिता पेवेकर राहणार दाभोळ यांच्याविरुद्ध दाभोळ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे
www.konkantoday.com