
डेंग्यू नियंत्रणासाठी जनतेचे सहकार्य हवे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव
डेंग्यू आजार पसरवण्यास एडिस इजिप्ताय हा डास कारणीभूत आहे. डेंग्यू रोगाचा प्रसार थांबवायचा असल्यास एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालणे आवश्यक आहे. डेंग्युचा प्रसार रोखण्यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी सांगितले.जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कीटकजन्य आजारांवर प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवून जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा केला जात आहे.www.konkantoday.com