ओझरे खुर्द येथील कृषीतंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवली अकरा फळांपासून टुटी फ्रुटी

देवरुख : नियमित वापरात न येणारी फळे यांचा वापर करत संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द येथील मातृमंदिर संचलित प्रा. मधु दंडवते कृषीतंत्र विद्यालयातील विद्यार्थी वर्गाने चक्क अकरा फळांपासून टुटी फ्रुटी बनवली आहे. चवदार व तोंडाला पाणी आणणारी टुटीफ्रुटी 5 तारखेपासून ग्राहकांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. याचबरोबर विद्यार्थी यांनी कोकोनट ऑईल, गांढूळ खत, लिंबाचे लोणचे असे उपक्रमही यशस्वी केले आहेत.
डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या मान्यताप्राप्त कृषी तंत्र विद्यालय चालवले जात आहे. कमवा व शिका या उक्ती प्रमाणे विद्यार्थी वर्गाला अभ्यासक्रमाबरोबर अर्थाजनांचा मार्गही दाखवला जात आहे. यातूनच विद्यार्थी यांनी नियमित अभ्यासक्रमातील फळांपासून विविध चविष्ट पदार्थ बनवणारे फळ प्रक्रिया या अभ्यासाचा उपयोग केला.
टुटी फ्रटी हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत अत्यंत आवडीचा आहे. यामुळे याला मागणीही मोठ्या प्रमाणात असते. याचाच अभ्यास करुन जान्हवी गुरव व सहकारी यांनी एक नव्हे तर अकरा फळांपासून टुटी फ्रुटी बनवण्याची किमया साधली.
यात प्रथम कलिंगडाचा पांढरा टाकावू भाग, कच्चा पपई, कोहळा, भोपळा, अ‍ॅपल बोर अशांसह अकरा फळांचा वापर करत साखर, व्हेनिगार व पाक यांचा उपयोग करत टुटीफ्रुटी तयार केली. अत्यंत चवीष्ट अशी टुटीफ्रुटी सर्वांनाच मोहून टाकत आहे.
टूटी फ्रुटीचा वापर हा आईस्क्रीम, खीर, मसालेपान, केक, श्रीखंड, गुलकंद यात केला जातो. तयार केलेली टुटी फ्रुटी मातृमंदिर संस्थेकडून दि. 5 मार्च रोजी होणार्‍या कलिंगड महोत्सवात ग्राहकांसाठी ठेवली जाणार आहे. टिकावू व गोड अशी टुटी फ्रुटी ग्राहकांना निश्चित गोडवा देणारी ठरणार आहे. विद्यालयाचे प्राचार्य समीर जाधव व प्रा. विनोद वाडकर, प्रा. श्रीकांत करंबेळे हे विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन करत असतात. यातून विद्यार्थी यांचे मनोबल वाढून नवनवीन उपक्रम करतात. यातूनच परिसरात असणारे नारळ याचा वापर करत घरगुती पध्दतीने दर्जेदार कोकोनट ऑईलही तयार केले आहे. तेल अनुष्का व ऐश्वर्या नलावडे यांनी तयार केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button