मालगुंड येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


मालगुंड : जिल्हारुग्णालय रत्नागिरी , समता फाउंडेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड तसेच ग्रामपंचायत मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मालगुंड येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात परिसरातील अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवून आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांची नोंद करून त्यांना पुढील शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात नागरिकांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली तसेच योग्य वेळी उपचार घेण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हारुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, समता फाउंडेशनचे पदाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व ग्रामपंचायत सरपंच मा.स्वेता खेऊर, व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
ग्रामीण भागात अशा प्रकारचे आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. या तपासणीत रुग्णाना मोतीबिंदू असल्याचे तपासणीत निदर्शनास आले त्यांची टप्या टप्प्याने मोफत शस्त्रक्रिया जिल्हारुग्णालयात होणार आहे. हे शिबीर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेश्वरी सातव यांच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी डॉ सुनीता पवार व डॉ ऋषिकेश डोके यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आरोग्य निरीक्षक डॉ परशुराम निवेंडकर यांनी या साठी विशेष प्रयत्न केले या वेळी असंसर्गिक आजाराची तपासणी ही करण्यात आली या साठी cho मनाली तारवे, आरोग्य सेविका अश्विनी गोवळकर, आरोग्य सेवक प्रवीण मंडले, आशा सुजाता मांडवकर, समीक्षा मेने यांनी काम पहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button