
साडवलीच्या सानवी भिंगार्डे हिची वीरगाथा राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वीरगाथा ५.० राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठीत स्पर्धेत साडवली येथील पी. एस बने इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता पाचवीची विद्यार्थीनी कुमारी सानवी शशांक भिंगार्डे हिची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कविता लेखन गट (इयत्ता ३ री ते ५ वी) मध्ये तिचा समावेश संपूर्ण देशातील राष्ट्रीय सुपर १०० विजेत्यांमध्ये करण्यात आला असून रत्नागिरी जिल्ह्यातून ही निवड झालेली ती एकमेव विद्यार्थीनी ठरली आहे.
देशातील शूर सैनिक, वीर शहीद व त्यांच्या पराक्रमाची प्रेरणादारी ओळख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा व सर्जनशीलता अभिव्यक्ती विकसित करणे, हा वीरगाथा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.www.konkantoday.com




