पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची मिनीबस हर्णे बायपासवर उलटली


पुणे येथील पर्यटकांना घेऊन जाणारी एक मिनीबस रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बायपासवर उलटल्याने १० जण जखमी झाले. आज दुपारी १२ ते १२:३० च्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या पुणेकरांवर दुर्दैवी प्रसंग ओढवला. दापोली तालुक्यात हर्णे बायपास मार्गावर हा भीषण अपघात घडला. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून आलेली MH 14 GU 1616 क्रमांकाची मिनीबस पर्यटकांना घेऊन जात होती. आज दुपारी साधारणपणे १२ ते १२:३० च्या दरम्यान, बस एका हॉटेलमधून बाहेर पडून घरी परतण्यासाठी निघत होती. त्यावेळी चालकाने बस रिव्हर्स घेताना त्याचा अंदाज चुकला. बसचा तोल इतका सुटला की ती थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाली. बस पलटी होताच आतमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले.या अपघातात एकूण १० पर्यटक जखमी झाले. काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या, तर काहींना मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या. जखमींमध्ये क्षितीज अशोक गुगणे (३५), आरोही पराग गायकवाड (४), पराग पर्शुराम गायकवाड (४०), नेहा पराग गायकवाड (३५), हितेश रमेश चौधरी (४०), ओजस अक्षय कुलकर्णी (५१), सुरेश साहेबराव कुचेकर, महेश दत्तात्रय वाघमारे (३९), प्राजक्ता महेश वाघमारे (३६) यांचा समावेश आहे. हे सर्वजण पिंपरी चिंचवड येथील रहिवासी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button