रत्नागिरीतील कोरोना योद्धे डॉ. मतीन परकार यांचे भारताच्या सहाय्यक विदेश व्यापार महासंचालकानी केले काैतुक
कोरोनाच्या लढाईत रत्नागिरीत देखील अनेक डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी स्वतःचे जीव धोक्यात घालून लढत आहेत. रत्नागिरीचे डॉ. मतीन परकार यांनी मार्च २०२० पासून जिल्हा रुग्णालय, महिला हॉस्पिटल, धन्वंतरी हॉस्पिटल आणि आता परकार हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना अहोरात्र सेवा देत आहेत. आपले वडील डॉ. अलीमिया परकार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत डॉ. मतीन परकार कोरोना रुग्णांना जी सेवा देत आहेत त्याबद्दल भारताचे सहाय्यक विदेश व्यापार महासंचालक अश्विन गोळपकर यांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी डॉ. मातीन परकार यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे कि डॉ. मतीन परकार आणि त्यांची टीम तसेच नर्सिंग कर्मचारी रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड साथीच्या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करीत आहेत हे पाहून मला फार आनंद झाला. आवश्यक औषधे, ऑक्सिजन किंवा इतर सुविधा असो, त्यांनी रुग्णांना कधीही निराश केले नाही. कृपया चांगले कार्य चालू ठेवा, देव तुम्हा सर्वांबरोबर असेल. सहाय्यक विदेश व्यापार महासंचालक अश्विन गोळपकर यांच्या वडिलांनी देखील डॉक्टर मतीन परकार यांच्याकडे उपचार घेतले हाेते
www.konkantoday.com